आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे भरती 2025 | NHM ZP Dhule Recruitment 2025

 मित्रांनो आजच्या या लेखामधून आम्ही आपल्याला NHM ZP Dhule Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धुळे अंतर्गत करण्यात येणार आहे. जर तुम्ही या भरतीची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे.

आरोग्य विभाग जिल्हा परिषद धुळे अंतर्गत विविध पदांच्या 16 जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. व या भरतीची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 26 मार्च 2025 आहे.

✅ सर्व भरतीच्या सविस्तर माहितीसाठी आपला व्हॉट्सॲप ग्रुप लगेच जॉईन करा 👇🏻💯
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रहो तुमची जर NHM Dhule मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला आधी या भरतीची सविस्तर माहिती समजून घेवूनच अर्ज करावा लागेल. तुम्हाला खाली या भरती संदर्भात भरण्यात येणाऱ्या पदांची नावे, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा व या भरतीची अधिकृत अधिसूचनेची (जाहिरातीची) लिंक ई. सर्व माहिती दिली आहे. 

पदाचे नाव :–

दंत शल्यचिकित्सक – 03 जागा

कार्यक्रम व्यवस्थापक- सार्वजनिक आरोग्य – 02 जागा

वैद्यकीय अधिकारी (RBSK पुरुष) – 02 जागा

वैद्यकीय अधिकारी (RBSK महिला) – 01 जागा

जीएनएम (महिला) – 06 जागा

कार्यक्रम सहाय्यक (SAKRI) – 01 जागा

फार्मासिस्ट – 01 जागा

रिक्त जागा :–

ही भरती एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी करण्यात येत आहेत.

वेतन :–

या पदांसाठी 17,000 ते 35,000 रूपये दर माह पदांनुसार वेगवेगळे वेतन देण्यात येते.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिलेली आहे.

अर्ज करण्याची तारीख :– 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवारांना 18 मार्च 2025 पासून 26 मार्च 2025 रोजी सायंकाळी 05:00 पर्यंत सुट्टीचे दिवस सोडून खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे लागणार आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे

वयोमर्यादा :–

या भरतीसाठी 18 वर्ष ते 38 वर्ष (राखीव 43 वर्ष) वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात लिंक दिली आहे.

अर्ज शुल्क :–  

खुल्या प्रवर्गासाठी 150 रूपये, तसेच राखीव प्रवर्गासाठी 100 रूपये शुल्क या पदासाठी आकारले जाणार आहे.

शैक्षणिक अर्हता –

दंत शल्यचिकित्सक : MDS / BDS + experience.

कार्यक्रम व्यवस्थापक – सार्वजनिक आरोग्य :- वैद्यकिय पदवीधर with MPH / MHA/MBA Health Care – संबंधीत अनुभव

वैद्यकिय अधिकारी (RBSK पुरुष): BAMS पदवी

वैद्यकिय अधिकारी (RBSK महिला): BAMS पदवी

GNM महीला : GNM / B.Sc. Nursing महीला उमेदवार

कार्यक्रम सहाय्यक (Sakri): कोणताही पदवीधर + मराठी टायपिंग– 30 शब्द प्रति मिनिट, इंग्लीश 40 शब्द प्रति मिनिट + MSCIT

फार्मासिस्ट – B. Pharm पदवी उत्तीर्ण.

अधिकच्या माहितीकरता दिलेली अधिकृत जाहिरात आपण पाहू शकता.

नोकरीचे ठिकाण

निवड झालेल्या उमेदवारांना धुळे येथे नोकरी मिळेल.

निवड प्रक्रिया – 

मिञांनो या भरतीसाठी निवड ही लेखी परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे होऊ शकते, अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिली आहे.

अर्ज करण्याची पद्धत – 

या भरतीसाठी सर्व पात्र उमेदवार ऑफलाईन अर्ज करू शकतील.

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्याच्याआधी भरतीसाठीची अधिकृत जाहिरात वाचावी.

सर्व उमेदवारांनी शेवटच्या तारखेच्याआधी अर्ज करावे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची 26 मार्च 2025 शेवटची तारीख आहे.

अधिक माहितीसाठी खाली अधिकृत जाहिरात दिलेली आहे.

अधिकृत जाहिरात पीडीएफ : येथे क्लिक करा

हेही वाचा:  नागपूर आरोग्य विभाग भरती

अर्ज नमुना: येथे क्लिक करा 

ऑफिशियल वेबसाईट: येथे क्लिक करा

निष्कर्ष – 

  मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आम्ही आपल्याला NHM Dhule Recruitment 2025 बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. मिञांनो ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धुळे अंतर्गत करण्यात येणार आहे. तुम्ही जर या भरतीसाठी पात्र होत आहात आणि Zilla Parishad Dhule मध्ये नोकरी करण्याची तुमची इच्छा असेल तर नक्कीच अर्ज करा. तसेच ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Leave a Comment